आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दररोज नवनवे खुलाशे होत आहेत. मंगळवारी विंदू दारा सिंह यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाने नवीन वळण घेतले. आपण चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकार्याच्या संपर्कात होतो, असे त्याने पोलिस चौकशीदरम्यान कबूल केले आहे.
विंदूने या अधिकार्यास कित्येकदा फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हीआयपी बॉक्स पर्यंत पोहच: विंदू दारा सिंह यांची चेन्नई सुपर किंग्जच्या व्हीआयपी बॉक्सपर्यंत पोहच होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यांना येथे जाण्या-येण्याची सूट का देण्यात आली होती, या विंदूवर पोलिस आता चौकशी करत आहे.