पंजाब किंग्ज उपांत्य फेरीत दाखल
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू कुमार संघकारा आणि शान मार्शच्या आक्रमक खेळाच्या जोरावर पंजाब इलेव्हन किंग्जने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आयपीएलच्या डेक्कन चार्जर्सविरूद्ध काल झालेल्या सामन्यात पंजाब संघाने सहा गडी राखून सहज विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करताना डेक्कन चार्जर्सने पंजाब संघापुढे विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघाने 19.3 षटकात चार गडी गमावून 178 धावा पूर्ण करून विजय मिळविला. या विजयामुळे पंजाब संघाला 18 गुण मिळाले असून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
'मॅन ऑफ द मॅच' म्हणून मार्शला सन्मानित करण्यात आले. त्याने 40 चेंडूत तीन चौकार व दोन षटकाराच्या मदतीने स्पर्धेतील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पाच सामन्यानंतर संघात परतलेल्या कुमार संघकाराने शानदार खेळ करत 23 चेंडूत सात चौकार व दोन षटकारच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
पहिल्या विकेटसाठी दोघांनी 45 चेंडूत 84 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. त्यापूर्वी डेक्कन चार्जर्सचा कर्णधार एडम गिलख्रिस्ट आणि रोहीत शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर चार गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. पंजाब संघाची मालकीन प्रिती झिंटाने सामनावीराचा पुरस्कार मार्शला प्रदान केला. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडीयादेखील उपस्थित होते.