Last Modified: कोलकाता , रविवार, 13 एप्रिल 2008 (14:09 IST)
पॉंटींगही शाहरुखचा चाहता
बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे.ऑस्ट्रेलियानं संघाचा कर्णधार रिकी पॉंटींगला शाहरुखला भेटायची उत्कट इच्छा आहे. आपणही शाहरुखचे चाहते असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
पॉंटींग आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असून, हा संघ शाहरुखच्या मालकीचा आहे. आयपीएल सामन्यांच्या सरावासाठी सध्या रिकी कोलकात्यात आला आहे. आपणही शाहरुखचे चाहते असून, त्याला भेटण्याची इच्छा त्याने सरावानंतर व्यक्त केली.