मुंबईविरूद्ध पंजाब आज लढत
उपांत्य पूर्व फेरीतील प्रवेशासाठी चुरस
आयपीएलच्या प्रत्येक सामना 'जिंका किंवा मरा' अशा प्रकारचा बनत चालला असून सलग सहा सामने जिंकून विक्रम करणारा मुंबई इंडियन्स सध्या खूपच फार्मात आहे. मंगळवारी (दि. 20) पंजाब किंग्ज इलेव्हन आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार असून या सामन्यात उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोघांत झुंज होणार आहे.
राजस्थान रॉयल्स 16 गुण मिळवून प्रथम तर पंजाब संघाने आतापर्यंत सात सामने जिंकले असून 14 गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे. सलग सहा सामने जिंकणारा मुंबई संघ 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या अकराव्या सामन्यात पंजाब विजय प्राप्त करण्याचा पयत्न करेल. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीचा प्रवेश सोपा होईल.
मुंबई इंडियन्सने सुरवातीचे चार सामने गमाविल्यानंतर स्पर्धेत शानदार पुनरागम केले आहे. सलग सहा सामने जिंकणारा पहिला संघ म्हणून मुंबई संघाने विक्रम केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने संघाची धुरा सांभाळल्यानंतर सलग तीन विजय मिळविले आहेत.