शाहरूख-गांगुली यांच्यात वाजले?
कोलकता नाईट रायडर्सच्या सततच्या पराभवाने वैतागलेला या संघाचा मालक शाहरूख खान आणि कर्णधार सौरभ गांगुली यांच्यात चांगलेच वाजल्याचे कळते. काल राजस्थान रॉयल्सकडूनही नाईट रायडर्सने माती खाल्ली.
बॉलीवूडमध्ये बादशाह असलेल्या शाहरूखचे क्रिकेटमध्ये काही चालले नाही. त्याचा संघ महागड्या संघांपैकी एक होता. शिवाय भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार आणि शाहरूखचा सर्वांत आवडता खेळाडू सौरव गांगुली शाहरूखकडे होता. पण गांगुली संघाला सेमीफायनलपर्यंतही नेऊ शकला नाही. खुद्द सौरभने फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली. त्याने आतापर्यंत झालेल्या बारा सामन्यात २१.९१ च्या सरासरीने फक्त २६३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाहून 'आयात' केलेला डेव्हिड हसीही संघासाठी 'पांढरा हत्ती' ठरला. त्याने बारा सामन्यात फक्त ३०७ धावा केल्या. पाकिस्तानच्या मोहम्मद हफीजला का घेतले हेच कळले नाही. त्याने आतापर्यंत फक्त ६४ धावा केल्या आहेत. इशांत शर्मा हा शाहरूखचा 'ड्रिम बॉलर' होता. पण त्याने बारा सामन्यात फ४० च्या सरासरीने फक्त सात बळी घेतले आहेत. रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर कसाबसा संघात आला. एका सामन्यात 'चमत्कार' दाखविल्यानंतर ही रावळपिंडी एक्सप्रेस रूळावरून जी घसरली ती अजूनही सावरलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटींग चार सामने खेळला. पण त्यातही फक्त ३९ धावा केल्या. थोडक्यात सुरवातीला मजबूत मानला जाणारा संघ सगळ्याच बाबतीत कमजोर ठरला.
आता या संघाकडे चांगले फलंदाजच नाहीत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोलंदाज असले तरी मैदानावर त्यांचा प्रभाव पडत नाही. त्या तुलनेत राजस्थान रॉयल्सकडे कोणतेही नाव नसणारे, अनुभव नसणारे फलंदाज आहेत. आणि त्यांनी भल्याभल्यांना पाणी पाजत गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.