1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

शोएबला आयपीएल मधूनही डच्चू

शोएबला आयपीएल मधूनही डच्चू
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शोएबवर पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर आता त्याला आयपीएल मधूनही डच्चू देण्यात आला आहे.

आयपीएल संचालक परिषदेचे अध्यक्ष ललित मोदी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाक क्रिकेट मंडळ जोपर्यंत त्याच्यावरील बंदी हटवणार नाही तोपर्यंत तो आयपीएल मध्येही खेळण्यास पात्र नसल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात पासीबीशी बोलणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पीसीबीने शोएबवर केलेले आरोप गंभीर आहेत. त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य का अयोग्य हे ठरवण्याचे अधिकार पीसीबीलाच असल्याचे ते म्हणाले. पण जोपर्यंत त्याच्यावरील बंदी हटवण्यात येत नाही तोपर्यंत तो खेळू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शोएब आयपीएलमध्ये शाहरुखच्या नाइट रायडर्स संघाकडून खेळणार होता.
About Writer
भाषा