शोएबला आयपीएलचे दरवाजे बंद
रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरवर घालण्यात आलेल्या पाच वर्षाची बंदी कायम ठेवत तीन सदस्यीय अपील समितीने त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखविला होता.
पण, शोएबला जोपर्यंत पाकिस्तानकडून खेळण्यासाठी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधावरी रात्री स्पष्ट केले आहे.
हा निर्णय आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी बंगळूर येथे झालेल्या बीसीसीआयच्या एका विशेष बैठकीत घेण्यात आला होता. बंदीच्या विरोधात त्याने केलेल्या अपीलाची सुनावणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने बंदी कायम ठेवत आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती.
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी अख्तरला चार लाख 25 हजार डॉलरमध्ये खरेदी केले आहे. शोएबला या स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळेल किंवा मिळणार नाही. पण, आयपीएलच्या निर्णयाचे पालन केले जाईल असे कोलकाता नाइट रायडर्सने आज स्पष्ट केले आहे.