1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 13 मे 2008 (22:58 IST)

सचिन आज खेळणार

सचिन आज खेळणार
इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात सचिन कधी खेळणार? हा गेल्या अनेक दिवसांपासून अनुत्तरीत असलेला प्रश्न आता सुटला असून सचिन आज होणार्‍या चेन्नईविरूद्धच्या लढतीत खेळणार आहे. त्यामुळे या विषयांवरील क्रिकेटप्रेमींच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दुखापतीमुळे आजपर्यंत सात सामन्यांना मुकणारा मास्टर ब्लास्टर अखेर आठव्या लढतीसाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना मुंबईत बुधवारी १४ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.