1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

सुपर किंग्जची मुंबईवर मात

चेन्नई सुपर किंग्ज सलग तिसर्‍यांदा विजयी

सुपर किंग्जची मुंबईवर मात
इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात किंग्जने मुंबई इंडियन्सचा सहा धावांनी पराभव केला.

सुपर किंग्जने हा सलग तिसरा विजय मिळविला आहे. 46 चेंडूत 81 धावांचा शानदार खेळ करणार्‍या मॅथ्यू हेडनला 'सामनावीराचा' पुरस्कार देण्यात आला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हरभजनसिंग याने नाणेफेक जिंकून सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

सुरेश रैनाचे अर्धशतक आणि सलामीवीर मॅथ्यू हेडनने बारा चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने केलेल्या 81 धावांच्या जोरावर पाच गडी गमावून 208 धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सपुढे ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंडियन्सने सात गडी गमावून 202 धावांपर्यंतच मजल मारली. मुंबई संघाकडून ए. एम. नायरने नाबाद 45, रॉबिन उथप्पा 43, हरभजन 28, ब्रावो 24, जयसूर्या 20, शॉन पोलॉक 17 आणि एम. खोटेने 9 धावा केल्या होत्या. सुपर किंग्जच्या मुरलीधरन आणि जोगिंदर शर्माने दोन-दोन, तर एम. गॉनी आणि अमरनाथने एक-एक बळी मिळविला.

डावाची सुरवात करणार्‍या हेडनने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याने तिसर्‍या विकेटसाठी 104 धावांची भागिदाली केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी शेवटच्या षटकात बाद होण्यापूर्वी 16 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. हेडनबरोबर सलामीला आलेल्या पार्थिव पटेलने तीन चौकार मारून किंग्जला आक्रमक सुरवात करून दिली होती. परंतु, चौदा धावसंख्येवर असताना त्याला आशिष नेहराने बाद केले.

सचिनच्या अनुपस्थितीत संघाला हा दुसरा जबरदस्त झटका बसला आहे.
About Writer
भाषा