सेहवाग-गंभीरचा शानदार खेळ
दिल्ली उपांत्य पूर्व फेरीच्या प्रतिक्षेत
आयपीएलच्या दिल्ली डेअर डेविल्सने बंगळूर रॉयल चॅलेंजर्सचा पाच गडी राखून पराभव करत संघाला उपांत्य पूर्व फेरीच्या स्पर्धेत कायम ठेवण्यास यशस्वी झाला आहे.
कर्णधार विरेंद्र सेहवाग (47) आणि गौतम गंभीर (39) या दोघांनी जबदरदस्त खेळ करून संघाला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्सने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीपुढे विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विरू सेनेने पाच गडी राखून 18.2 षटकात 158 धावा पूर्ण केल्या होत्या.
सेहवागने केवळ 19 चेंडूत नऊ चौकार व एक षटकाराच्या मदतीने 47 धावांचा जबरदस्त खेळ केला. परंतु, तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. तर गंभीरने 31 चेंडूत सहा चौकाराच्या मदतीने 39 धावांचा खेळ केला.
या दोघांनी पहिल्या विकेटसाठी सात षटकात 90 धावांचा खेळ केला होता. दिल्लीचा आपल्या बाराव्या सामन्यात सहावा विजय असून आतापर्यंत त्यांनी 12 गुणांसह तालिकेत पाचवे स्थान प्राप्त केले आहे.