शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: रविवार, 5 मे 2024 (10:27 IST)

IPL 2024: सर्वात वेगवान गोलंदाज आयपीएलच्या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर

Mayank Yadav Pace
सध्या IPL च्या प्लेऑफ मध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व संघ एकमेकांना कठीण स्पर्धा देत असताना आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या सामन्यात एका संघाचा वेगवान युवा खेळाडू दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात खेळताना दिसणार नाही. या खेळाडूला दुखापतीमुळे या ऑक्शनपासून दूर रहावे लागेल. 
 
लखनौसुपर जॉईन्टस संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव आयपीएलच्या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पोटाच्या खालच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील आयपीएलचे सामने खेळू शकणार नाही. 
सदर माहिती लखनौचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिली आहे. 

मयंकने चार सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहे. पण दोन सामन्यांत तो चार षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही. त्याचे स्कॅनिंग करण्यात आले असून ज्या ठिकाणी त्याला आधी दुखापत झाली आहे त्याच ठिकाणी पुन्हा दुखापत झाली  आहे. या दुखापतीमुळे तो पुढील सामने खेळू शकणार नाही. 
त्याने या हंगामाच्या सुरुवातीला आरसीबीच्या विरुद्ध च्या सामन्यात ताशी 156.7 किमीच्या वेगाने चेंडू टाकला होता जो या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू आहे. 

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 च्या लिलावादरम्यान मयंक यादवचा संघात समावेश केला होता. मयंक यादव 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्याला मूळ किंमतीवरच खरेदी केले होते. यानंतर तो दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला होता. यावेळी त्याला पदार्पणाची संधी मिळाली, मात्र तो पुन्हा एकदा जखमी झाला. 
 
Edited By- Priya Dixit