1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: रविवार, 5 मे 2024 (13:39 IST)

PBKS vs CSK : आज पंजाब किंग्सचा सामना चेन्नई सुपर किंग्स शी होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

PBKS vs CSK
आयपीएल 2024 चा 53 वा सामना पंजाब आणि CSK यांच्यात रविवार, 5 मे रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार.दोन्ही संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार. या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना सीएसकेच्या प्लेइंग-11 मध्ये परत येऊ शकतो. 

पंजाब ने चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात पराभव केला होता. गेल्या तीन सामन्यातील दुसरा पराभवाने संघ अडचणीत आला आहे. सीएसके 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या संघाची फलंदाजी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेवर अवलंबवून आहे. गायकवाड ने या हंगामातील पाचवी 50 पेक्षा जास्त धावसंख्या केली.
 
सध्या सीएसके संघ त्याच्या वेगवान गोलंदाजाच्या दुखापतीमुळे चिंतेत आहे. या मध्ये दीपक चाहरचा समावेश आहे याचा हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्याची शक्यता या दुसऱ्या सामन्यात खेळण्याची नाही. प्रमुख गोलंदाज मथीशा पाथिराना आणि  तुषार देशपांडे यांची अनुपस्थिती संघाचे नुकसान करत आहे.  
पंजाब किंग्सने सतत विजय मिळवून प्लेऑफच्या आशा पल्लवित केल्या आहेत. CSK वरील विजयासह, पंजाब किंग्स हा मुंबई इंडियन्स नंतर गतविजेत्या CSK वर सलग पाच विजय नोंदवणारा दुसरा संघ बनला.
पंजाब किंग्ज ने अहमदाबाद मध्ये गुजरातवर, चेपाक मध्ये सीएसके वर, आणि केकेआर विरुद्ध विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला. संघाच्या गोलंदाजी विभागात कागिसो रबाडा, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि सॅम कुरान या अनुभवी नावांचा समावेश आहे.
 
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
 
पंजाब किंग्ज: जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग 
 
चेन्नई सुपर किंग्ज: अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डेरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, रिचर्ड. मथीशा पाथिराना.

Edited By- Priya Dixit