suvichar
✕

Meta पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांची छाटणी !

Updated: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (11:27 IST)
 
IANS ने इनसाइडर पब्लिकेशनच्या अहवालात सांगितले आहे की मेटा फेसबुकमध्ये गुप्तपणे ही छाटणी करत आहे. मे महिन्यातच मेटा मालक मार्क झुकेरबर्गने तसे संकेत दिल्याने फेसबुकचे कर्मचारी अनेक महिन्यांपासून यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. मेटाचे संस्थापक आणि सीईओ झुकरबर्ग यांनी कर्मचार्‍यांसह मेटाच्या कमाईशी संबंधित अंतर्गत कॉल दरम्यान हे सूचित केले.
 
झुकरबर्गने स्पष्ट केले होते की सर्व विभागांमध्ये भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच कंपनीत लवकरच छाटणी करण्याचे त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की पुढील वर्षी सतत कपात करणे आमच्या योजनेत समाविष्ट आहे. या दरम्यान अनेक संघ कमी केले जातील जेणेकरुन त्यांची उर्जा इतर क्षेत्रात वापरता येईल.
 
अहवालानुसार छाटणीची जबाबदारी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे, जे या कामात मूकपणे गुंतले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी दर्जेदार नाही अशा कर्मचाऱ्यांना ते चिन्हांकित करून बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. फेसबुकच्या काही कर्मचार्‍यांच्या मते कंपनी पुढे जात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु वास्तव हे आहे की लोकांना जबरदस्तीने बाहेर काढले जात आहे.
 
कमाईत घट झाल्याने मेटाने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. मेमध्‍ये हायरिंग फ्रीजची माहिती समोर आल्‍यानंतर मेटाच्‍या स्टॉकची किंमत $380 वर घसरली. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 60 टक्क्यांनी घसरली आहे. आगामी आर्थिक मंदीमुळे आतापासूनच कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून त्याचा खर्च नियंत्रणात ठेवता येईल. Meta च्या या वृत्तावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

सिंहगड किल्ल्यावर फडकणार १०० फूट उंच भव्य भगवा ध्वज! पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

ग्लेन फिलिप्सच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सलग दुसरा टी२० सामना जिंकला

LIVE: देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकादमी अमरावती येथे सुरू होणार

राहुल गांधी रामलीला मैदानावर म्हणाले, ज्ञानेश कुमार तुरुंगात जातील, ही सामान्य चोरी नाही

पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

पुढील लेख
Show comments