शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. झारखंड निवडणूक 2019
Written By

झारखंड विधानसभेची निवडणूक पाच टप्प्यात

झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येथे पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या, १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या, १६ डिसेंबर रोजी चौथ्या आणि २० डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 
 
येत्या ५ जानेवारी रोजी झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. झारखंडमध्ये एकूण १९ जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील ६७ मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत.
 
३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी १३ जागांसाठी मतदान होणार आहे
 
७ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी २० जागांवर मतदान होणार आहे
 
१२ डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यात १७ जागांवर मतदान होणार आहे
 
१६ डिसेंबर रोजी चौथ्या टप्प्यात १५ जागांवर मतदान होईल
 
२० डिसेंबर रोजी पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात १६ जागांवर मतदान होणार आहे.