कतरीना आणि सलमानचे लग्न होणार काय?
कतरीना कैफने सलमान खानच्या जीवनात प्रवेश केला तेव्हा ऐश्वर्याच्या विरहाने सलमान पोळलेला होता. 'देवदास' चित्रपट ऐश्वर्याने केला खरा, पण इकडे देवदास झाला मात्र सलमान. योगायोगाने कतरीना आणि सलमानचे सूर जुळले आणि कतरीनाच्या करीयरलाही 'लिफ्ट' मिळाली. हळूहळू सलमानची गर्लफ्रेंड म्हणून ती ओळखली जाऊ लागली. कतरीना आणि सलमान दोघेही आपल्या खासगी आयुष्याची चर्चा करत नाही. पण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत हे दिसून येते. दोघांत वयाचे अंतर बरेच आहे. पण कतरीनालाच अडचण नसेल तर इतरांचे काय? सलमानने सांगितलं, तर कतरीना करीयर सोडून त्याच्याशी लग्न करून घरही बसेल. सलमानच्या कुटुंबात कतरीना सून म्हणून चालणार आहे. खरं तर सलमान म्हणतो ते त्याच्या कुटुंबियांना मान्य असते. म्हणूनच संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय याही सून म्हणून खान कुटुंबियांना पसंत होत्या. पण दुर्देव. यातली एकही त्यांच्या घरी येऊ शकली नाही. आता सलमान आणि कतरीना यांच्या लग्नाची तारीख ठरल्याच्या बातम्या वारंवार उडत असतात. पण दरवेळी त्या अफवाच ठरतात. त्यामुळे यांचे लग्न नक्की होणार काय? हा प्रश्न आहे की सलमानच्या मागच्या नायिकांच्या यादीत तिचेही नाव समाविष्ट होणार हे पहायचे.