कतरीना कामाबाबत गंभीर
|
अनेकदा शूटिंगवेळी अपघात घडूनदेखील तिने शूटिंग थांबवले नाही. राजकुमार संतोषी यांच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' चे शूटिंग
सुरू होते. एका सीनमध्ये रणबीरला कॅटरीनाला थप्पड मारायची होती. रणबीरने चूक केली आणि त्याने गालाऐवजी चेह-यावर तडाखा
हाणला. हा तडाखा एवढा जबरदस्त होता की कॅटरीना रडू लागली. तातडीने रणबीरने माफी मागितली पण, तिच्या वेदना कमी होईनात. शूटिंग थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला पण, हे ऐकल्यावर मात्र तिने रडे आवरले आणि शूटिंग थांबू न देता पुन्हा काम सुरू केले. शेवटी तिचा लौकीक तिला जपायचा होता ना.
