आता सगळ्यांच कलावंतांना निर्माता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. ऐश्वर्या राय (दिल का रिश्ता), मनीषा कोईराला (पैसा वसुल), रवीना टंडन (स्टम्प्ड) यांनीही निर्मितीत हात पोळून घेतले. सुष्मिता सेनही राणी लक्ष्मीबाई नावाची फिल्म बनवतेय. या नायिकांनंतर आता कतरीना कैफही यात उतरते आहे. एका फ्रेंच फिल्मवर आधारीत फिल्म ती बनविणार आहे. तिचे हक्क मिळविण्याच्या प्रयत्नात ती आहे. त्यात ती निर्माता व अभिनय अशा दोन्ही जबाबदार्या सांभाळणार आहे.