पैशांसाठी चित्रपट करत नाही- कतरीना
बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच आपली नाममुद्रा उमटविणारी कतरीना कैफ म्हणते, मी फक्त पैशांसाठी चित्रपट करत नाही. आणि करणारही नाही. कतरीनाला सात बहिणी आहेत. घरात ती एकमेव कमावती आहे. अनेकदा पैसे नसतात. पैशांची तीव्र निकड असते. अशा वेळी एखादा चित्रपट येतो. अशा वेळी मानसिक दबाव खूप असतो. केवळ या दबावापुढे झुकून मी चित्रपट स्वीकारला तर लोकांना ते आवडेल का याचा मी विचार करते आणि त्याला नकार देते, असे कतरीना म्हणते. '
बूम' या चित्रपटाच्या माध्यमातून कतरीना बॉलीवूडमध्ये आली. अक्षय कुमारबरोबर तिचा नमस्ते लंडन हीट ठरला नि मग त्यांची जोडी जमली. आता तर ती टॉपची अभिनेत्री गणली जाते. आपले फिल्मी जीवन हा अनुभव शिकण्याचा एक भाग असल्याचे ती मानते. फिल्मी दुनियेत आली तेव्हा गोविंदा, अक्षय व सलमानसारख्या कलावंतांकडून इथल्या शिस्तीचे धडे मिळाले. त्यामुळे आपण स्वतःचे पाय इथे घट्ट रोवू शकलो, असेही ती नम्रपणे सांगते.