सलमान-कतरीनाचे लग्न शक्य नाही
बॉलीवूडची टॉप अभिनेत्री असणारी कतरीना कैफ 16 जुलै रोजी 26 वर्षाची होणार आहे. कतरीनाला बॉलीवूडमध्ये येऊन 6 वर्ष पूर्ण झाले आहे आणि तेव्हा पासूनच तिचे व सलमानच्या संबंधांवर प्रश्नचिह्न कायम आहे? कतरीनाने सलमानबरोबर तिच्या संबंधांबद्दल कधी मोकळेपणाने बोलली नाही पण नकारही दिला नाही आहे.आता असं ऐकण्यात आले आहे की त्या दोघांच्या संबंधांत खटके उडत आहे पण खरं काय ते त्या दोघांनाच माहीत. ज्योतिष शास्त्रानुसार सलमान आणि कतरीना स्वभावातून एक दुसऱ्यांच्या बिलकुल विपरीत आहे. दोघांच्या विचारांमध्येसुद्धा समानता नसल्याचे आढळून आल्यामुळे दोघांनी लग्न नाही करायला पाहिजे. ते दोघेही चांगले मित्र म्हणून राहू शकतात पण लग्न केले तर ते अपयशी ठरेल.