suvichar

भाजपकडून 27 एप्रिलला ‘दाव रे तो व्हिडीओ’

गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:51 IST)
मनसेच्या प्रत्येक सभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’, असे आदेश देत व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका करणारे मनसे नेते राज ठाकरे यांच्याविरोधात, आता भाजपही मैदानात उतरला आहे. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपकडून 27 एप्रिल रोजी ‘दाव रे तो व्हिडीओ’ असे प्रत्युत्तर देत, राज यांचा पोलखोल केला जाणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे स्टार प्रचारक विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे हे सभा घेत आहेत. प्रत्येक सभेमध्ये पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष शहा यांचे मागील व्हिडीओ दाखवत ते टीका करत आहेत. त्यामुळे राज यांना त्याच स्टाईलने भाजप 27 तारखेच्या सभेत उत्तर देणार आहोत. 27 एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरू ठेवाव्यात, असे आव्हान तावडे यांनी दिले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

कार थेट २० फूट खाली कोसळली! मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघलेल्या माय-लेकीचा जागीच दुर्दैवी मृत्यू

LIVE: राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्

बारावीत ७५% पेक्षा कमी गुण मिळवलेल्यांनाही आयआयटीमध्ये प्रवेश मिळेल, आयआयटी रुरकीचा नवा नियम

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

राजेश एक्सपोर्ट्सच्या महाघोटाळ्यात LIC चा निधी अडकला; सामान्य गुंतवणूकदारांची कष्टाची कमाई धोक्यात?

पुढील लेख
Show comments