सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Updated : सोमवार, 21 जून 2021 (18:11 IST)

छोट्या पडद्यावरील गाजणारा शो बिग बॉस मराठी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजणारा कलर्स मराठी टीव्हीवर येणारा मराठी शो बिग बॉस 3 लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे आणि बिग बॉस मराठी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.असे सांगितले आहे.आता पुन्हा प्रेक्षकांच्या कानात दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार,कारण येतोय मराठी बिग बॉस 3 कलर्स मराठी वर 'असे कॅप्शन देण्यात आले आहे. 
 
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण आवडीने बघितला जाणारा हा शो बिग बॉस मराठीचे पहिले पर्व 15 एप्रिल 2018 रोजी पार पडले.या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे ही ठरली.दुसऱ्या पर्वाचे विजेते शिव ठाकरे ठरले.या शो चे हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले होते.
 
लवकरच या शो चे तिसरे पर्व देखील प्रेक्षकांचा भेटीला येणार असे सांगण्यात आले होते त्यामुळे प्रेक्षकांना हे 3 रे पर्व कधी येणार या बद्दल उत्सुकता होती.आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी बिग बॉस मराठी चे 3 रे पर्व कलर्स मराठी वर येण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता या शो बद्दल अधिकच वाढली आहे.