तात्या विंचू आला
झपाटलेला 2
PR |
महेश कोठारे दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमातून तात्या विंचू आणि त्याचा बोलका बाहुला घडविणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांची अचंबित करणारी कामगिरी पुन्हा एकदा बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तर आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, राघवेंद्र कडकोळ, विजय चव्हाण आणि मकरंद अनासपुरे यांच्या दमदार अदाकारीने हा सिनेमा सजला आहे. सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स प्रस्तुत आणि कोठारे अँन्ड कोठारे व्हिजननिर्मित झपाटलेला 2 हा सिनेमा थ्रीडी रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मराठीतला थ्रीडी तंत्रज्ञानावर चित्रीत होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. येत्या 7 जूनला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
