पंजाबी चित्रपटाचा मराठीत रिमेक
|
या चित्रपटाच्या भक्तीपर गीतांच्या ध्वनीफितीचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. ज्येष्ठ अभिनेते दारासिंग आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यास चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. या चित्रपटात आठ भावपूर्ण गीते आहेत. गीतकार सागर पवार यांनी ती लिहिली असून ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. उत्तरा केळकर, अजित कडकडे, आनंद शिंदे, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल या सुरेल गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
या ऑडिओ सीडीमध्ये भक्तीपर रचानांसोबत गोंधळ, आरती, लावणी, जोगवा अशा वैविध्यपूर्ण गीतांचा रसिक श्रोत्यांना आस्वाद घेता येणार आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा-दिग्दर्शक ठाकूर तपस्वी यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे महासचिव आणि हिंदीतील निर्माते-दिग्दर्शक ठाकूर तपस्वी यांच्या देवीच्या श्रद्धेचे माहात्म्य सांगणार्या या चित्रपटात शशांक उदापुरकर, निशा परुळेकर, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, मेघा घाडगे, मुग्धा शहा, प्रमोद नलावडे, रुपांजली माने, तेजश्री, हनुमान या मराठी कलावंतांनी महत्तवपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

