''फॉरेनची पाटलीण'' कोल्हापूरात
- राम कोडींलकर
|
सुरवातीला पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यापाठोपाठ हा चित्रपट मराठवाडा, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्रसह कोकणातही दिमाखात प्रदर्शित होणार आहे.
|
चित्रपटाची निर्मिती संजीवनी गवई यांनी आपल्या 'एस ४ एंटरटेन्मेंट' बॅनरखाली वेत्र्ली आहे. चित्रपटाच्या निर्मितीचा हा पहिलाच अनुभव असला तरी आपल्या मनात नेहमीपेक्षा वेगळा चित्रपट द्यायचा असे मनात होते. तसेच पडद्यावर साकल्याचे संजीवनी गवई म्हणाल्या. मराठी प्रेक्षकांचे दर्जेदार मनोरंजन करण्याच्या तळमळीतून आपण या क्षेत्रात उडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
|
या चित्रपटाला संगीतबद्ध केलंय लोकप्रिय संगीतकार अशोक पत्की यांनी. तर गावरान ढंगाची मस्त गाणी लिहिली आहे. कवी फ. मु. शिंदे यांनी. कथा-पटकथा, संवाद अशी महत्त्वाची जबाबदारी प्रताप गंगावणे यांनी पार पाडली आहे. चित्रपटाच्या निर्मितीची सूत्रे कार्यकारी निर्माते पवन वैद्य यांनी समर्थपणे सांभाळली आहेत.
