'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'
'मुंबई आणि मराठी माणूस' हा मुद्दा महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मराठी माणसाच्या मनावरची भळाळती जखम आहे. या मुद्यावर पक्ष, संघटना स्थापन झाल्या, तरी तो प्रश्न काही सुटला नाही. मग अभिव्यक्तीच्या माध्यमातून म्हणजे नाटका-चित्रपटातूनही हा मुद्दा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मांडला गेला. काही दिवसांपूर्वी तर 'भय्य हातपाय पसरी' नावाचे 'भय्यांना' 'टार्गेट' करणारे नाटकही येऊन गेले. पण आता मात्र, याच विषयावर काही वेगळे भाष्य करणारा सिनेमाच येऊ घातलाय. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे या सिनेमाचं नाव.
नावावरून हा ऐतिहासिक चित्रपट असावा असे वाटू शकते मात्र, तो तसा नाही. मुंबईतून नाहिशा होत चाललेल्या मराठी माणसाला केंद्रिभूत ठेवून हा चित्रपट काढला गेला आहे. दिनकर मारूती भोसले हे यातलं मध्यवर्ती कॅरेक्टर. मुंबईतल्या कॉस्मोपॉलिटिन जगात हा दिनकर भोसले अगदी पिचून गेलाय. कुठेही संधी मिळत नाही, अशी त्याची अवस्था झालीय. मुंबई महाराष्ट्रात असली तरी मुंबईत महाराष्ट्रा नाही, अशी त्याची खंत आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यात आपलं जगणं हरवतं आहे, अशी त्याची भावना आहे. या सगळ्याचं खापर तो आपल्या पाचशे पिढ्यांवर फोडतोय. या पाचशे पिढ्यांनी केलेल्या पापामुळेच आपण मराठी म्हणून जन्माला आलोय, अशा शब्दांत तो या पूर्वजांचा उद्धार करतो.
तिकडे प्रतापगडावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्याचा हा त्रागा ऐकतात आणि वेगळ्या रूपात त्याच्या समोर येऊन ठाकतात. स्वतःच्या मराठीपणालाच त्याने घातलेल्या शिव्या महाराजांना सहन होत नाही. ते त्यालाच खडे बोल सुनावून त्याच्या आणि पर्यायाने मराठी माणसाच्या दोषांवर बोट ठेवतात. इतरांना दोष देण्याआधी स्वतः केलेल्या चुका सुधारण्याचा सल्ला ते दिनकररावांना देतात. त्यांच्या या बोलण्याने दिनकररावांचे डोळे उघडतात का? मराठीबद्दलचा त्याचा स्वाभीमान पुन्हा जागृत होतो काय? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातून लवकरच पहायला मिळतील.
दिनकर भोसलेंच्या भूमिकेत सचिन खेडेकर, सुमित्रा भोसलेंच्या भूमिकेत सुचित्रा बांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रिया बापट, अभिजित केळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिवाजीराजांच्या भूमिकेत महेश मांजरेकर आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकरांचे आहे. कथा महेश मांजरेकरांची तर पटकथा त्यांच्यासह अभिजित देशपांडेची आहे. संवाद मांजरेकरांनीच संजय पवारांच्या साथीने लिहिले आहेत. संगीत अजित, समीर व अतुल यांचे आहे.
येत्या तीन एप्रिलला हा चित्रपट अवघ्या महाराष्ट्रात रिलीज होतोय.
नावावरून हा ऐतिहासिक चित्रपट असावा असे वाटू शकते मात्र, तो तसा नाही. मुंबईतून नाहिशा होत चाललेल्या मराठी माणसाला केंद्रिभूत ठेवून हा चित्रपट काढला गेला आहे. दिनकर मारूती भोसले हे यातलं मध्यवर्ती कॅरेक्टर. मुंबईतल्या कॉस्मोपॉलिटिन जगात हा दिनकर भोसले अगदी पिचून गेलाय. कुठेही संधी मिळत नाही, अशी त्याची अवस्था झालीय. मुंबई महाराष्ट्रात असली तरी मुंबईत महाराष्ट्रा नाही, अशी त्याची खंत आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यात आपलं जगणं हरवतं आहे, अशी त्याची भावना आहे. या सगळ्याचं खापर तो आपल्या पाचशे पिढ्यांवर फोडतोय. या पाचशे पिढ्यांनी केलेल्या पापामुळेच आपण मराठी म्हणून जन्माला आलोय, अशा शब्दांत तो या पूर्वजांचा उद्धार करतो.
| |
|