मुक्ती- द फायनल फ्रीडम
- चंद्रकांत शिंदे
आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबाची परवड दाखवणारा
WD |
कर्जबाजारी शेतकर्यांच्या आत्महत्येवर आजवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट तयार झाले आहेत. देशभरातील हा एक ज्वलंत विषय आहे परंतु या आत्महत्यांची फक्त चर्चाच होते. यावर तोडगा आजवर निघालेला नाही वा कोणी काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु आता निर्माते सचिन जानकर यांनी आपल्या मुक्ती- द फायनल फ्रीडम या चित्रपटाद्वारे या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडमधील सरे येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेल्या सचिनचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मच्छिंद्र मोरे यांनी केले असून सुकेत देडीया चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
एका शेतकर्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना जे काही भोगावे लागते त्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे. चित्रपटाची कथा व गीते दिग्दर्शक मच्छिंद्र मोरे यांनीच लिहिलेली असून बी. ए. तुपे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हरीश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाद्वारे लोकप्रिय झालेल्या नंदू माधव यांनी शेतकर्याची भूमिका साकारली असून सिंधुताई सकपाळ या चित्रपटात सिंधुताईंची मुख्य भूमिका साकारणार्या तेजस्विनी पंडितने शेतकर्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. नागेश भोसले, मिलींद शिंदे, अजय जाधव, सतीश सलागरे, अमीर तळवळकर, गौरव कांबळे व चार्वी साツगोळकर यांच्याही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

