बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (18:18 IST)

मला मुख्यमंत्री घोषित करा, अजित पवारांनी अमित शहांकडे CM ची खुर्ची मागितली का?

Ajit Pawar denies he sought CM’s post during meeting with Amit Shah
दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अजित पवार यांनी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी विचारमंथन करण्यासाठी मुंबई दौरा आटोपल्यानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शहा यांनी मुंबई विमानतळावर महाआघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली.
 
'द हिंदू' या इंग्रजी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अजित यांनी गृहमंत्री शाह यांना मोठा प्रस्ताव दिला आहे. निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री घोषित करा, महाराष्ट्रात ‘बिहार पॅटर्न’ लागू करा, असे पवार म्हणाले.
 
एकीकडे निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाची हुकलेली संधी मिळविण्यासाठी देवेंद्र फडणवीस तयारीला लागले आहेत. याशिवाय अजित पवार यांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे, त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्रिपदावरून मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मात्र पुण्यात मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी या बातमीचे खंडन करत म्हटले की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. मला याबद्दल काहीही माहिती नसून आमची असली कुठलीही चर्चा झालेली नाही.
 
अमित शहा मुंबईत गणपती दर्शनासाठी आले होते आणि या दरम्यान कांदा निर्यात, अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे पिकांचे झालेले नुकसान, किमान आधारभूत किंमत या मुद्द्यांवर चर्चा झाली.