सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शनिवार, 23 नोव्हेंबर 2024 (17:06 IST)

अजित पवार यांनी मतदार बांधवांचे आभार मानत अशी प्रतिक्रिया दिली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर केले जात आहे. या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना यश मिळालं हे काम राज्यातील जनतेमुळे , महायुतीचे विकास काम, पंतप्रधान मोदींवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचं आहे.तसेच महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी अडीच वर्ष केलेल्या कष्टातून आजचे हे यश आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 
 
महायुतीने आणलेली लाडकी बहीण योजना सारख्या अनेक योजना लाभार्थी पर्यंत पोहोचवण्यासाठी  महायुतीचे लाखो कार्यकर्त्ये शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनापासून केलेल्या कामामुळे हे यश मिळालं आहे. हे श्रेय त्यांना देत आहे. महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी आमच्या अपेक्षेपेक्षा भरभरून मतदान केलं. राज्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानत आहे. 

विधानसभा निवडणुकीत महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय पटावर एका नवा अध्याय लिहिला जात आहे. या विजयाचे श्रेय माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आहे. मी त्यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आपल्या भावना भरभरून मत दिले. 
 
महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे महायुतीला अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे. हे फक्त निवडणुकीतील यश नसून राज्यातील जनतेच्या आशा-आकांक्षांचा विजय आहे. 
 
त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मिळालेल्या जनतेच्या प्रतिसादाचे कौतुक केले आणि त्यांच्या भावनिक समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यातील जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. हा केवळ महायुतीचा राजकीय विजय नसून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला, कामगार, उद्योजक आणि वंचित घटकांच्या इच्छा आणि आकांक्षांचा विजय आहे.

या विजयामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारे, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देणारे धोरण आखणे आणि ते अंमलात आणणे आता हाच आमचा निर्धार आहे. 
 
 महायुतीतील प्रत्येक पक्षाने प्रचंड मेहनत घेऊन आपले कर्तव्य बजावले. हे यश या सर्व घटकांच्या एकजुटीचे फलित आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी दारे उघडली जातील. महायुती सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या राज्य सरकारमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सुद्धा यानिमित्ताने आभार मानतो.

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्यापक योजना राबविण्याचा महायुतीचा संकल्प असून आता आम्ही महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात देशातील अग्रगण्य राज्य बनवण्यासाठी झटणार आहोत. विकास, रोजगार, कृषी सुधारणा, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचे हे आमचे ध्येय आहे.राज्यातील प्रत्येक घटकाने दाखवलेल्या विश्वासाने आम्हाला मोठी जबाबदारी दिली आहे. आता आपल्या अपेक्षांना साजेसं काम करत महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचे आमचे प्राधान्य राहील,असे ते म्हणाले. 
Edited By - Priya  Dixit