बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (13:07 IST)

झारखंड आणि महाराष्ट्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार-चिराग पासवानचा दावा

chirag paswan
Chirag Paswan News : झारखंड आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पूर्णपणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला. दोन्ही ठिकाणी एनडीएला आशीर्वाद मिळाला. असे देखील ते म्हणाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार चिराग पासवान म्हणाले की, झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीएच्या बाजूने आहे. झारखंड आणि महाराष्ट्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मी निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलो होतो तेव्हा झारखंडमध्ये परिवर्तनाचे वारे दिसत होते, तर महाराष्ट्रात आमचे सरकार आहे आणि आमचेच सरकार राहणार आहे, असेही ते म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik