गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (11:26 IST)

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-एमव्हीएची बोट बुडाली-भाजप नेत्या शायना एनसी

Shaina
महाराष्ट्रात विधासभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून,सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. तसेच दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या शायना एनसी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. 
  
मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेत्या शायना एनसी म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीची "बोट बुडाली आहे" आणि महायुती आघाडी राज्यात पुन्हा सत्तेवर येईल असा दावा देखील यांनी केला आहे. महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  
 
शायना एनसी म्हणाल्या की, “ही तीच काँग्रेस आहे जी शिवसेना, संजय राऊत यांच्यावर भाष्य करत राहते, उमेदवारांची अदलाबदल करतात, नावे बदलतात. त्यांची बोट आता बुडाली आहे. 23 नोव्हेंबरला महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येईल असे देखील त्या म्हणाल्या. 

Edited By- Dhanashri Naik