शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (10:06 IST)

वायनाडमध्ये आपत्ती निवारणाचे आश्वासन देऊनही मोदींनी मदत केली नाही खर्गे यांचा आरोप

Wayanad Kerala News : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केला.   
मिळालेल्या माहितीनुसार वायनाड लोकसभेच्या निलांबूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी वड्रा यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेला संबोधित करताना खर्गे यांनी मोदींना 'खोटे' म्हटले आहे. वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनाचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की मोदींची आश्वासने पोकळ ठरली. तसेच ते म्हणाले की,  मी नेहमी म्हणायचो की मोदी खोटे आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपत्ती निवारणात विरोधी-शासित राज्यांशी भेदभाव केला असल्याचा आरोप खरगे यांनी केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्याही बाबतीत कधीही भेदभाव केला नाही असे देखील ते म्हणाले,  

Edited By- Dhanashri Naik