गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (16:39 IST)

Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

amit shah
महाराष्ट्र निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले असून प्रचार सभा घेण्यात येत आहे. अमित शहा देखील प्रचार सभा घेत आहे. मुंबईत त्यानी सभेत बोलतांना नरेंद्र मोदी सरकार काहीही झाले तरी वक्फ बोर्ड कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करेल आणि त्यानंतर कोणीही खाजगी जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करू शकणार नाही, अशी गर्जना केली.
 
शहा म्हणाले की, महाविकास आघाडी या बदलांच्या विरोधात आहे, मात्र वक्फ बोर्डाबाबत कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लवकरच संसदेत मंजूर केले जाईल. शहा म्हणाले की, आत्ताच आमच्या सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले आहे.
 
काही दिवसांपूर्वी काँग्रेसशासित कर्नाटकातील गावे वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली होती. अनेक मंदिरे, लोकांची घरे, शेतकऱ्यांची जमीनही वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली, मात्र वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर तुमची जमीन वक्फ म्हणून घेता येणार नाही.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार वक्फ कायद्यात अचानक बदल करणार आहे, त्यानंतर कोणाचीही जमीन किंवा घर वक्फ मालमत्ता म्हणून घोषित होणार नाही. हा स्वतंत्र भारत आहे आणि कोणालाही हे करण्याची परवानगी नाही. असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit