बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 (14:25 IST)

दिल्लीनंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द, हे कारण आहे

महाराष्ट्र आजही मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत असून शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नवी दिल्लीहून मुंबईत परतले. मुंबईत होणारी महायुतीची ही बैठकही रद्द करण्यात आली आहे.
 
या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र सरकार स्थापनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती.

आता मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आली असून प्रथम भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे त्यात भाजप विधिमंडळाच्या पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे. नंतर महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दिल्लीहून येणाऱ्या  एक डिसेंबरला दोन्ही निरीक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे.
 
गुरुवारी रात्री उशिरा राजधानी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी शहा यांच्याशी झालेली बैठक सकारात्मक आणि अर्थपूर्ण झाल्याचे सांगितले. पुढील बैठक शुक्रवारी मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात आले होते.  अजित पवार दुपारी मुंबईला परतणार आहेत.
पण बैठक रद्द झाल्यामुळे भाजपला विधीमंडळाच्या पक्षाची बैठक बोलवावी लागणार आहे. 
Edited By - Priya Dixit