Exit Poll 2024 महाराष्ट्रात सरकार कोण बनवणार, एक्झिट पोल काय सांगतात?
Mahrashtra Exit Polls LIVE Updates : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले आहे. आता प्रतीक्षा आहे 23 नोव्हेंबरची जेव्हा ईव्हीएममधून निकाल जाहीर होतील. यापूर्वी विविध एजन्सीचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
सर्वे एजेंसी |
महायुती सीट्स |
एमवीए सीट्स |
इतर |
Matrize |
150-170 |
110-130 |
08-10 |
Chanakya Strategies |
152-160 |
130 -138 |
06-08 |
Poll Diary |
122-186 |
69-121 |
12-29 |
PMARQ |
137-157 |
126-146 |
2-8 |
Lokshani Marathi-Rudra |
128-142 |
125-140 |
18-23 |
Bhaskar Reports Poll |
125-140 |
135-150 |
20-25 |
महाराष्ट्र एक्झिट पोल अपडेट्स: महाराष्ट्रात मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकालही जाहीर झाले आहेत. विधानसभेच्या सर्व 288 जागांवर आज मतदान झाले. एक्झिट पोलच्या निकालानुसार यावेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत आहे.
पीपल्स पल्स सर्व्हेनुसार, महायुतीला 175 ते 195 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर एमव्हीएला 85 ते 112 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 7 ते 12 जागा मिळू शकतात.