रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (08:53 IST)

महाराष्ट्रातील लोकांमध्ये जातीचे विष पसरवले-शरद पवारांवर राज ठाकरेंचा आरोप

raj thackeray
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यवतमाळ जिल्ह्यात होते. तसेच त्यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लबोल केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी जातीमध्ये विष पेरण्याचे काम केले आहे.
 
राज ठाकरे म्हणाले की, आज महाराष्ट्र राज्याला जातीच्या प्रश्नात अडकवून ठेवण्याचे काम केले जात आहे. महान नेते आणि संतांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. पण सध्याच्या काळात राज्यात जातीवादाचे विष पसरविण्याचे  काम करणारे संत आहे त्या संताचे नाव आहे शरद पवार. तसेच मतदारांनी जाती-पातीच्या भोवऱ्यात न अडकता विचारपूर्वक मतदान करावे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. असे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी राळेगावात केले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत राळेगाव शहरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.