रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (16:29 IST)

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

sharad panwar
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होणार असून अद्याप कोणत्याही पक्षाने जागावाटप केली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणूकीसाठी जागावाटपाच्या चर्चेवर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन माविआच्या सदस्यांना केले आहे.

विधानसभा निवडणूक 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये होणाऱ्या जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होत नसल्याचे ते म्हणाले. त्याच्यावर काहीही वक्तव्य देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. 

मी या चर्चेत सहभागी होत नाही.आमच्या वतीने या बैठकीत जयंत पाटील उपस्थित असतात.तेच या विषयावर बोलू शकतील. 

काँग्रेस कडून नाना पाटोळे आणि त्यांचे काही सहकारी आणि शिवसेने उबाठाच्या वतीने संजय राऊत आणि त्यांचे अन्य सहकारी चर्चेत आहे. आता पर्यंत त्यांच्या तीन ते चार बैठका झाल्या असून त्यातून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काही मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे ऐकण्यात येत आहे.

काही मुद्द्यांवरून त्यांना एकत्र बसावं लागणार आहे. येत्या 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला ते एकत्र बसणार आहे असे शरद पवार म्हणाले. मी त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने एकत्र बसून लवकर निर्णय घेण्याची विनंती करतो. 
Edited by - Priya Dixit