शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2024 (15:02 IST)

वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाकडून मिळाले गॅस सिलेंडर निवडणूक चिन्ह

prakash ambedkar
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचे विधानसभा निवडणुकासाठी नवे निवडणूक चिन्ह दिले आहे. आता पक्षाचे निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर असणार. 
 केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला या बाबतचे पत्र पक्षाला दिले आहे. त्यामुळे आता या पक्षाला या चिन्हावर निवडणूक लढवता येणार.पक्षाने या चिन्हाबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली. 
 
वंचित बहुजन आघाडी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र लोकसभा,विधानसभा, ते स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरील विविध निवडणुकांमध्ये सक्रीय सहभाग घेत आहे. निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी समाधानकारक नसली तरीही पक्षाने मतदारांचा टक्का कायम ठेवला आहे. पक्षाला अद्याप निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते. त्यामुळे पक्षाला आपले उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर उभे करावे लागत होते. निवडणुकीत या पक्षाचा एकही उमेदवार निवडनू आला नाही. 

आता विधानसभा निवडणुका जवळच येत आहे. सर्व पक्ष या साठी तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणूकांसाठी प्रकाश आंबेडकर देखील आता या निवडणूक चिन्हालाला घेऊन निवडणूक लढवणार. पक्षाला मिळालेलं हे निवडणूक चिन्ह नवी प्रेरणा ठरू शकते. निवडणूक चिन्ह मिळाल्यामुळे वंचित बहुजन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले आहे. 
Edited by - Priya Dixit