ganesh chaturthi
✕

Madhu Makarand Fort मधु मकरंद गड

Updated: रविवार, 12 मार्च 2023 (22:48 IST)
 
समोर पूर्वेला मकरंद तर पश्चिमेला मधूचा सुळक्या भाग आव्हान देत होता. एक पाण्याची विहीर पाहून झाडांच्या गर्दीत शिरलो. कोना खोर्‍याचं जंगल इथपर्यंत पसरलेलं आहे. त्यातच जावळीचा गहिरा होत जाणारा घनगर्दपणा दृष्टीला पडतो. पक्ष्यांचा किलबिलाट आणि प्रकाशकिरणांची वसुंधरेला भेटण्याची उत्सुकता यामुळे जंगल चढण सोपी वाटू लागली. पावले झपझप पडू लागली. ठिकठिकाणी कारवीचं रान सोबतीला होतं. चढण चढताना अनेक फसव्या वाटा दृष्टीला पडत होत. मार्गदर्शक असल्यामुळे चुकण्याची भीती नव्हती.
 
दोन तासांच्या चढणीनंतर आम्हाला एक शिवमंदिर दिसले. तिथे दर्शन घेऊन आम्ही थोडा विसावा आणि अल्पोपहार घेतला. बर्‍याच जणांकडे थर्मास असल्यामुळे गरम चहा मिळत होता. आम्ही मंदिराच्या पूर्व दिशेने माथ्याकडे निघालो. मोकळा आसमंत मुरुमाची घसरडी वाट सुरू झाली. थोडय़ाच वेळात उद्ध्वस्त दरवाजा दिसू लागला. अगदी माथ्यावर पुन्हा एक शिवमंदिर दिसले.
 
मंदिराच्या उत्तर भागात एका अवघड कपारीत पाण्याची टाकी आहे. मकरंद गडाच्या माथ्यावरून वाव्याकडे मधुगडाचा सुळका दिसतो. या मंदिरातच आम्ही मुक्काम केला. आमच्याबरोबर असलेल्या महिलांनी स्वयंपाक केला. रात्री चविष्ट जेवण मिळाले.
 
दूरवर पायथ्याशी लुकलुकणारे दिवे आणि आकाशातील टिपूर चांदणे मोहून टाकत होते. भल्या पहाटे उगवतीचे रंग उधळण्यासमयी सह्याद्रीचे चौफेर विहंगम दृश्य नहाळण्यात नजरेचं पारणं फिटलं. पूर्वेला कोना खोरे आणि महाबळेश्वर परिसर तर गडाच्या पश्चिमेला रसाळ, सुमार, महिपत हे त्रिकुट एकाच डोंगरधारेवर तोलून उभे असल्यासारखे वाटत होते.
 
दक्षिणेला चकदेव, महिमंडण, वासोटा ही कोना खोर्‍यातील ठिकाणे कुतूहल निर्माण करत होती. सर्व बाजूंचा सह्याद्री गोतावळा आणि मधुर आठवणींचा मकरंद गड नजरेत साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. प्रवासाचा शीण वाटला नाही. स्मृती मात्र तरळत होत्या.

म.अ. खाडिलकर 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

डोळ्यात अश्रू दाटून आले पण विद्युत जामवाल २० मिनिटे पापणीही न मिटवता उभा राहिला, व्हिडीओ हायरल

खलनायकापासून सुपरस्टारपर्यंतचा प्रवास; विनोद खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांनाही दिली होती कडवी टक्कर

राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले 'तुरुंग हेच योग्य ठिकाण,' २ कोटी जमा करण्याची शेवटची संधी

राजे-महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील देवीची मंदिरे

मुंबईत 'रामायण'च्या सेटवर आग, चित्रीकरण थांबवले

पुढील लेख
Show comments