मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. कौल महाराष्ट्राचा
  3. झळा दुष्काळाचा
Written By
Last Updated :उस्मानाबाद , सोमवार, 11 एप्रिल 2016 (16:14 IST)

ऐन दुष्काळात गारपीटीचा तडाखा

दुष्काळ आणी पाणीटंचाईने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपलं. जिल्ह्यातल्या महत्वाच्या तालुक्यांमध्ये फटका शेतकऱ्यांना बसला.

काही भागात पावसामुळे वीजही खंडीत झाली. पण काल आलेल्या पावसामुळे पाच वर्षात ज्या नदी नाल्यांची पात्र कोरडी राहीली होती. ते पहिल्यांदाच भरुन वाहिले.उस्मानबाद तालुक्यातील तडवळा परीसरात गारपीट, वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. तर पळसप  परिसरातही गारपीट झाली.  कळंब आणि तुळजापूर तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला.दुसरीकडे कोंबडवाडी शिवारात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे या परिसरातील नदी -नाले तब्बल पाच वर्षानंतर वाहिले.