मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

दुष्काळाच्या झळा!

WD
उन्हाळयाची तीव्रता वाढत असल्याने दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याचा व चा-याचा प्रश्न गंभीर होत चालला असून टँकरच्या संख्येत रोज २० ची भर पडत आहे. चारा छावण्यातील जनावरांची संख्या ७ लाखांवर तर रोजगार हमीवरील मजुरांची संख्या ३ लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे पुढील २ महिने युद्धपातळीवर दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज सांगितले. जनावरांच्या चा-यासाठी दिल्या जाणा-या अनुदानात वाढ करण्याचा, जनावरांच्या छावण्यांशेजारी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचा तसेच टँकरसाठी तालुका स्तरावर निविदा काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देतानाच अभयारण्यातील वन्य पशुंनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीच्या बैठकीत आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दर पंधरा दिवसाला टँकरच्या संख्येत ३०० नी भर पडत असून जून पर्यंत टँकरची संख्या ७ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरच्या निविदा तालुका स्तरांवर काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळामुळे प्रशासकीय खर्चातही वाढ झाली असून त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पतंगराव कदम व पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पुढील दोन महिन्यांचा कालावधी कठीण असेल असे सुतोवाच केले.
- See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?id=71042&cat=Mainpage#sthash.2WB0w7WJ.dpuf