मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. कौल महाराष्ट्राचा
  3. झळा दुष्काळाचा
Written By
Last Modified: हरिद्वार , सोमवार, 11 एप्रिल 2016 (10:51 IST)

साईबाबांच्या पुजेमुळे दुष्काळ : स्वामी स्वरुपानंद सरस्वती

शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण झाला आहे, असे खळबळजनक विधान द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.
 
साईबाबा देव नाहीत त्यांची पुजा करु नये असे म्हणणारे स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, साईबाबा फकीर होते म्हणून त्यांची देव म्हणून पुजा करणे अशुभ आहे. ज्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते त्याठिकाणी निसगार्चा प्रकोप होतो. त्या ठिकाणी दुष्काळ, पूर यासारखी संकट येऊन मृत्यूचे भय निर्माण होते, असे ते म्हणाले.