सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:42 IST)

पन्हाळा किल्ला

Panhala fort
बाराव्या शतकातील बांधलेला पन्हाळा हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्यापैकी एक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील 500 हुन अधिक दिवस इथेच घालवले. 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर किल्ल्यावर औरंगजेबाने किल्ल्यावर काबीज केले. 1692 मध्ये किल्ल्यावर काशी रंगनाथ सरपोतदार ह्यांनी परशुराम पंत प्रतिनिधींच्या नेतृत्वात काबीज केले. 
1701 मध्ये औरंगाजेबाने पुन्हा किल्यावर ताबा घेतला.परंतु काहीच महिन्यानंतर पंत अमत्य रामचंद्राने ह्याला पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. पुढे या किल्ल्याला ब्रिटिशांनी 1844 मध्ये आपल्या ताब्यात घेतले. 

पन्हाळा किल्ला कसं जावं -
चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून एसटीने किंवा खाजगी वाहनाने किल्ल्यावर जाता येते .ही वाट चार दरवाजामार्गे गडावर प्रवेश करते.
 
प्रेक्षणीय स्थळे- 
*राजवाडा - हा ताराबाईंचा वाडा असे. यातील देवघर बघण्यासारखे आहे. इथे नगरपालिका कार्यालय,पन्हाळा हाय स्कूल आणि मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे. 
 
*सज्जाकोठी -इथे संभाजी राजे प्रांताचा कारभार बघायचे. 
 
*राजदिंडी- इथूनच छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले.आणि विशाळगडावर पोहोचले.
 
*अंबारखाना- हा पूर्वीचा बालेकिल्ला गंगा,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत या शिवाय इथे सरकारी कचेऱ्या,दारुगोळ्याची कोठारे आणि टाकसाळ होती.
 
*चार दरवाजा- इथे शिवा काशीद ह्यांचा पुतळा आहे.
 
*सोमाळे तलाव- इथे मोठे तळ आहे. तळाच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. 
 
*रामचंद्र अमात्यांची समाधी- सोमेश्वर तलावाच्या पुढे गेल्यावर दोन समाध्या आहेत उजवीकडची रामचंद्र अमात्यांची आणि बाजूची त्यांच्या पत्नीची.
 
* रेडेमहाल-बाजूला आडवी इमारत रेडेमहाल आहे.जनावरे बांधत असल्याने ह्याला रेडेमहाल म्हणतात.
 
*छत्रपती संभाजी मंदिर- इथे संभाजीचे मंदिर आहे.
 
* धर्मकोठी- धान्य ठेवण्याची जागा आहे येथे यथायोग्य दान धर्म करत होते.
 
*अंदरबाव- तीन कमानींची काळ्या दगडाची वास्तू आहे.तीन मजली आहे. 
 
*महालक्ष्मी मंदिर- राजवाड्यातून बाहेर पडल्यावर महालक्ष्मी मंदिर आहे. 
 
* तीन दरवाजा- पश्चिमेकडील महत्त्वाचा दरवाजा.
 
*बाजीप्रभूंचा पुतळा- एसटी थांब्यावरून खाली आल्यावर ऐसपैस चौकात  वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा पुतळा आहे.हे प्रेक्षणीय स्थळे आहेत.