Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा केवळ टाईमपास: टोपे

Updated: शुक्रवार, 9 डिसेंबर 2016 (09:54 IST)
 
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु केवळ प्रतिज्ञापत्र सादर होऊ न शकल्याने कोर्टाने त्याला स्थगिती दिली. प्रतिज्ञापत्र लवकरात-लवकर कोर्टात सादर करुन सरकारची योग्य बाजू मांडणे हे विद्यमान सरकारचे काम होते. परंतु गेल्या दोन वर्षात हे सरकार गप्प राहिले, प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. यावरुनच या सरकारची मराठा आरक्षणाबाबत असणारी उदासिनता दिसून येते.
 
या उदासिनतेचे दुसरे उदाहरण म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास राज्याच्या मागासवर्गीय आयोगाची शिफारस असणे अनिवार्य आहे. परंतु सध्या आपल्या राज्यात मागासवर्गीय आयोगच अस्तित्वात नाही. जर मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची शिफारस बंधनकारक असेल तर ते कसे देणार असा सवाल करीत सरकारने लवकरात-लवकर या आयोगाचे गठण करणं गरजेचं असल्याचे टोपे यांनी सांगितले.
 
जाट आरक्षणाचे उदाहरण देताना ते म्हणाले जाट आरक्षणाला राज्य व केंद्र मागासवर्गीय आयोगाचा विरोध असताना देखील संसदेत आपले अधिकार वापरुन शेड्युल्ड नऊ मध्ये जाठ समाजाला आरक्षण मिळवून दिले गेले होते. तशा पध्दतीचा संसदेला अधिकार आहे. मग राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचेच सरकार आहे. त्यांनी कुठल्याही निर्णयाची वाट न पाहता आता मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे अशी मागणी यावेळी राजेश टोपे यांनी केली.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

इन्फ्लुएन्सर मनजीत कौरला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले; ५४ दिवसांनंतर तिचा मृत्यू

पुण्यात घराच्या दाराआड किरकोळ वादावरून लेकानं आईचा गळा चिरून निर्घृण हत्या केली

LIVE: नाशिकच्या आखाड्यांसाठी आणि आश्रमांसाठी निधी वाढवण्याचा मोठा निर्णय

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत संजय राऊतांच्या २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

पानिपत टोल प्लाझाजवळ ग्रेट खालीच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावले

पुढील लेख
Show comments