1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
  4. Then our second social will be Panipat: Shivendra Raje

तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्र राजे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.
 
मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करु नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं बोललं जातं. मराठा समाजात दुफळी असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.
पुढील लेख
नितेश राणे म्हणतात, देवा अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला वाचव