शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (08:11 IST)

वेळ पडली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू: शिवेंद्रराजे भोसले

मराठा आरक्षण स्थगितीबाबत मराठा समाज म्हणून जी भूमिका घेतली जाईल त्याबाबत आपण समाजाबरोबर राहू आणि वेळ पडली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागले तरी त्यासाठी तयार असल्याची थेट भूमिका साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून बाजू योग्य पद्धतीने मांडली गेली नाही आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. सर्वोच्य न्यायालयाकडून मराठा समाजाच्या आरक्षणाला जी स्थगिती देण्यात आली याबाबत समाज म्हणून जी भूमिका घेतली जाईल त्याबाबत मी समाजाबरोबर राहणार आणि वेळ पडली तर आंदोलनात सहभागी होईन, असे ते म्हणाले.