शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:24 IST)

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि यशस्वी देखील झाले. त्यानंतर आता ‘पानिपत’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबदद्ल टि्वटकरून सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.
 
‘पानिपत’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट उद्या म्हणजेच शुक्रवार ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गोवारीकरांच्या खांद्यावर या ऐतिहासिक चित्रपटाची धुरा असल्यामुळे मराठी भाषिकांमध्येही सिनेमाविषयी उत्सुकता आहे. त्यातच राज ठाकरे यांनी ‘पानिपत’ चित्रपटाचं कौतुक केल्यामुळे या ऐतिहासिक महानाट्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे आतुर झाले आहेत.
 
‘पानिपतची लढाई ही मऱ्हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा’, असं आवाहन राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन केलं आहे.
 
पानिपत’ चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सॅनन तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त पाहायला मिळणार आहे. अजय- अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. पानिपत’ हा चित्रपट पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालं होतं. 1761 मध्ये हरियाणातील पानिपतच्या मैदानावर झालेल्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.