गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:00 IST)

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: मिथुन

या वर्षी आपले आरोग्य नेहमीच्या अपेक्षा काहीसे उत्तम असेल. विशेष म्हणजे या वर्षाची सुरुवात खूप अनुकूल असणार. वर काळात आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सशक्त असाल.
 
एप्रिल ते जुलै या काळात आपणास आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. लहान सहान आरोग्याच्या तक्रारी एखाद्या मोठ्या आजाराला जन्म देऊ शकते म्हणून काळजी घ्यावी. वेळेतच त्याची दक्षता घेणे योग्य ठरेल. कुठल्याही लहान आरोग्याच्या तक्रारीस वेळेतच वैद्यकीय सल्ला घ्या.
 
अश्या प्रकारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आपणास एखादा आजार होऊ शकतो. एखादा आजार आधी पासून असल्यास त्यात वाढ होऊ शकते. त्यासाठी आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 
 
जानेवारीनंतर आपल्या वडिलांच्या आरोग्याच्या तक्रारी होतील. आपण शिळे आणि गरिष्ठ आहार घेणे टाळावे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे असंतुलित आहार घेणे देखील टाळावे. व्यस्त कामकाजामुळे आपणास थकवा देखील येईल, म्हणून हे लक्षात ठेवा की कामाच्या दरम्यान तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. हा थकवा एखाद्या आजाराचे रूप घेऊ शकते. 
 
या वर्षी आपणास गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात, गॅस, अपचन अश्या समस्या उद्भवू शकतात. जुलै ते नोव्हेंबरची कालावधी आपल्या आरोग्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात आपल्याला आपल्या जुन्या आजारांपासून आराम मिळेल. सप्टेंबरच्या मध्यानंतर आरोग्य अधिक अनुकूल असू शकते. तरी आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 
 
जर आपण ऋतुकाळाच्या रोगाने ग्रस्त असाल तर आपण लवकरच स्वस्थ व्हाल. या वर्षी आपण कोणत्याही प्रकारचा नशा आणि अती मांसाहार टाळावा. आळस सोडून शरीर निरोगी होण्यासाठी वेळेनुसार आणि व्यायामानुसार सामान्य आणि संतुलित प्रमाणात आहार घ्या. निरोगी राहण्या साठी योग्य आणि ध्यान करा.