साप्ताहिक राशीफल 1 ते 7 नोव्हेंबर 2020

Weekly Horoscope2020
Weekly Horoscope 2020
Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (20:32 IST)
मेष - नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले अ- ल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल.

वृषभ
- कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा अ- ल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कडक धोरणाचा जाच वाटेल. विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीचे तंत्र उपयोगी पडेल.

मिथुन - पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रुसवेफुगवे सहन करावे लागतील. त्याकरता मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी चांगल्या ग्रहमानाचा फायदा घ्यावा.

कर्क - हाताबाहेर गेलेल्या गोष्टी रुळावर येतील. तुमच्या कार्यपद्धतीत आणि विचारात बदल होईल. व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधून तुमचा मतलब साध्य कराल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेला महत्त्व द्या. कामात बदल हवा अ- ल तर त्या दृष्टीने हालचाल करावी. घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल. वेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तरुणांनी विवाहाचा निर्णय घाईने घेऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरची पकड ढिली करू नये.

सिंह - सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. कारखानदारांनी कामगारांशी मर्यादेपेक्षा जास्त मवाळपणाने वागू नये. नोकरीत युक्तीने कामात चालढकल कराल. घरामध्ये तात्त्विक मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी मूड बाजूला ठेवावेत.

कन्या - तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये कामाच्या रचनेत फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ताण वाढेल. घरातील व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.


तूळ - एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड . सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. घरामध्ये प्रत्येकजण आपले तेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी शंकांचे वेळीच निरसन करावे.

वृश्चिक - काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. विद्यार्थ्यांनी नवे प्रयोग टाळावेत.

धनू
- तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी . व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये.

मकर - तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत अ-
पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्याच कामात तुमची धाडसी प्रवृत्ती दिसून येईल. लांबलेल्या कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळावा.

कुंभ - गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावे.

मीन - अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल. सवलतींचा उपयोग योग्य कारणाकरताच करावा. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू नका. केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रिय व्यक्ती आणि मित्रमंडळी खर्चात टाकतील.



यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

मकरसंक्रातीला सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन 12 मंत्रांचा जप

मकरसंक्रातीला सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन 12 मंत्रांचा जप करा
14 जानेवारीला सूर्य मकर राशीत जाईल आणि खरमास संपेल, रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन 12 ...

Skanda Sashti 2022: स्कंद षष्टीची तारीख, महत्त्व आणि पूजा ...

Skanda Sashti 2022: स्कंद षष्टीची तारीख, महत्त्व आणि पूजा पद्धती जाणून घ्या
Skanda Sashti 2022: स्कंद षष्ठी हा दक्षिण भारतात साजरा केला जाणारा एक अतिशय महत्त्वाचा सण ...

मकर संक्रांतीची पौराणिक कथा

मकर संक्रांतीची पौराणिक कथा
मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. ...

Guruvar Vrat: गुरुवारी व्रत केल्यास भगवान विष्णू, लक्ष्मी, ...

Guruvar Vrat: गुरुवारी व्रत केल्यास भगवान विष्णू, लक्ष्मी, गणेशजीही होतील प्रसन्न
गुरुवार व्रत: आज गुरुवार हा धार्मिक दृष्टीकोनातून अतिशय शुभ दिवस आहे. गुरुवारी व्रत ...

हिंदू कॅलेंडरमध्ये पौष महिन्याचे महत्त्व, या महिन्यात हे ...

हिंदू कॅलेंडरमध्ये पौष महिन्याचे महत्त्व, या महिन्यात हे काम नक्की करा
हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याची स्वतःची खासियत असते आणि प्रत्येक महिना कोणत्या ना ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...