ganesh chaturthi
✕

टोमॅटो : भाववाढीचा ग्राऊंड रिपोर्ट

Updated: गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (12:12 IST)

खुल्या बाजारात ग्राहकांना टोमॅटो  १०० ते १२० रुपये प्रति किलो दराने विकत घ्यावे लागत असताना मात्र शेतकरी वर्गाच्या टोमॅटोला होलसेल बाजारात ४० रुपये किलो ने दर मिळत आहे.दोन महिन्यापूर्वी हाच टोमॅटो २० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात होता.दोनच महिन्यात टोमॅटोचे भाव पाच पट वाढल्याने  देशात टोमेटोची चर्चा जोरात सुरु आहे.

टोमॅटो मध्ये मोठ्या व्यापर्याकड़ून नफेखोरी करुण अव्वच्या च्या सव्वा दराने विक्री सुरु आहे.प्रत्यक्षात या दरवाढीचा फायदा शेतकरी वर्गाला होताना दिसत नाही.देशातील सर्व सामान्य मानुस आणि शेतकरी वर्गाला फटका बसत आहे.

शेतकरी वर्गाला बाजार समितिमध्ये  टोमॅटोला ३० ते ४० रुपये किलो मिळत आहे.तर दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबाला टोमॅटोसाठी १०० रुपये ते १२० रुपये प्रति किलोने खरेदी करावा लागत आहे त्यामुळे मधले घटकाची यात चांदी होत आहे.देशामध्ये टोमेटोचे सर्वात जास्त उत्पादन हे महाराष्ट्र, कर्नाटक,हिमाचल प्रदेश या राज्यात होत असते.आशिया खंडातील कांद्याबरोबर टोमेटो साठी नाशिक जिल्ह्याच नाव घेतले जाते.येथील मुख्य बाजार समितित शेतकरी वर्गाला २० किलोच्या कैरेट साथी ७०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे

निफाड तालुक्यातील रानवड येथील टोमॅटो उत्पादक विनायक कुशारे यांनी ३० आर क्षेत्रात १०५७ वाण टोमाटोची लागवड केली आहे . त्याचा उत्पादन खर्च मला आतापर्यंत ६० ते ७० हजार रुपये झालेला आहे . त्यापैकी २० जाळ्या टमाटो ची चांदवड कृषी बाजार समितीत विक्री केली.प्रति जाळी प्रतवारीनुसार ४७५ रुपये प्रमाणे मला ९ हजार ७५३ रुपये मिळाले .त्यात वाहनखर्च व हमाली वगळता  मला आवगे २० रुपये प्रति किलो भाव मिळाला .मात्र हाच टमाटा विक्रिते बाजारात १०० ते १२० रुपये किलो ने विक्री करीत आहे .मात्र शेतक-यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही ही वस्तु स्थिति आहे.प्रति किलो ८० ते १०० रुपये नफा काढून  टोमॅटोची विक्री सुरु आहे.

मागील वर्षी टोमॅटोला दोन ते अडीच रुपये किलोने भाव।मिळला होता त्यामुळे या वर्षी येथील शेतकर्यनी सुधा टोमॅटोची।लागवड कमी।केलेली आहे.मिळलेल्या भावातुन उत्पादन खर्च ही न निघाल्याने त्यांनी तो रस्त्यावर फेकून दिलेले होता.

ग्राहकांना प्रतिकिलो 100 रुपयांनी मिळणाऱ्या टोमॅटोचे शेतकऱ्यांच्या हाती फक्त 20 ते 40 रुपये मिळत आहेत. टोमॅटो महाग झाला मात्र त्याचा फायदा नेमका कुणाला होत आहे .

टोमेटोचे भाव वाढीचा ग्राउंड रिपोर्ट

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments