शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2016 (17:10 IST)

85 कोटींची ‘झिंगाट’ कमाई

‘सैराट’ मराठी सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. मराठी सिनेमांवर प्रेम करणार्‍या सर्वाच्या नजरा आता लागल्या आहेत ते ‘100 कोटी’ क्लबकडे. 100 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ही बिरुदावली सैराटला मिळणार का? हाच प्रश्न आता ‘सैराट‘ प्रेमींना आहे. सैराट आता 5 व्या आठवडय़ात पोहोचला असून सोमवारपर्यंत सैराटची कमाई ही 85.66 कोटी इतकी झाली आहे. सैराट आजही गर्दी खेचत असून 500 च्यावर सिनेमागृहांत सैराट दाखवला जात आहे. साहजिकच ‘सैराट’ 100 कोटींचा टप्पा पूर्ण करेल असा अंदाज ट्रेड एक्सपर्ट व्यक्त करत आहेत. तरण आदर्शसारख्या नामवंत ट्रेड एक्सपर्टने गेल्याच आठवडय़ात ‘सैराट’ 100 कोटीपर्यंत पोहोचणार असा अंदाज व्यक्त केला होता. बॉलिवूडचे नामवंत दिग्दर्शक प्रीतिश नंदी यांनीही हा अंदाज व्यक्त केला होता. सैराटने पहिल्या आठवडय़ात 25.5 कोटी रुपये, दुसर्‍या आठवडय़ात 24.66 कोटी, तिसर्‍या आठवडय़ात 16 कोटी आणि चौथ्या आठवडय़ात 15 कोटींचा व्यवसाय केला आहे. पाचव्या आठवडय़ात रविवारपर्यंत सैराटने पाच कोटींचा व्यवसाय केला आहे. सैराटचे सध्या युनायटेड अरब अमिरातीमध्येही स्क्रिनिंग सुरू आहे. 
 
एकूणच ‘सैराट’ने 100 कोटींच्या क्लबमध्ये विराजमान व्हावे, अशीच इच्छा चाहत्यांची असणार.